मुंबई । वाहनांचे जग वेगाने बदलत आहे. पेट्रोल आणि डिझेल नंतर आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू झाले आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीशी संबंधित व्यवसायही बदलत आहे. आता बॅटरीचे स्टॉक्स मागील एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहेत. तथापि, एक्सपर्ट बॅटरी इंडस्ट्रीज मध्ये टेक्नोलॉजी डिसरप्शनबद्दल बोलत आहेत. परंतु असे असूनही, या बॅटरी स्टॉक्सची नावे लोकांच्या जिभेवर चढू लागली आहेत.
गेल्या 1 वर्षात या क्षेत्राशी संबंधित 5 असे स्टॉक्स आहेत ज्यामध्ये 80-650 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापैकी High Energy Batteries, Eveready Industries, आणि HBL Power Systems या स्टॉक्समध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
काही स्टॉक्स आता कमकुवतपणा दर्शवू लागले आहेत
पण SWOT विश्लेषकांच्या मते, या 5 कंपन्यांपैकी असे 3 स्टॉक्स आता कमकुवत होण्याची चिन्हे दर्शवित आहेत. त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे आणि प्रमोटर्स या कंपन्यांमधील आपला हिस्सा देखील कमी करत आहेत. दरम्यान, मार्केट कॅपच्या बाबतीत, Exide Industries आणि Amara Raja Batteries या टॉप दोन कंपन्या गेल्या एका वर्षात केवळ 18 टक्के आणि 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
चला तर मग ‘या’ कंपन्यांकडे एक नजर टाकू
High Energy Batteries (India)
1 वर्षात या शेअरच्या किंमतीत 688 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7 जुलै 2021 रोजी हा स्टॉक्स 1646 रुपयांवर दिसला. याची मार्केट कॅप 295 कोटी रुपये आहे.
Eveready Industries India
1 वर्षात या शेअरच्या किंमतीत 275 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7 जुलै 2021 रोजी हा स्टॉक्स 316 रुपये होता. याची मार्केट कॅप 2294 कोटी रुपये आहे.
HBL Power Systems
1 वर्षात या शेअरच्या किंमतीत 215 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7 जुलै 2021 रोजी हा स्टॉक्स 54 रुपये होता. याची मार्केट कॅप 1509 कोटी रुपये आहे.
Panasonic Energy India Company
1 वर्षात या स्टॉकच्या किंमतीत 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7 जुलै 2021 रोजी हा स्टॉक्स 283 रुपये होता. याची मार्केट कॅप 212 कोटी रुपये आहे.
Indo-National
1 वर्षात या शेअरच्या किंमतीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7 जुलै 2021 रोजी हा स्टॉक्स 995 रुपयांवर दिसला. याची मार्केट कॅप 373 कोटी रुपये आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा