भविष्यात एखाद्या गायकाच्या आत्महत्येचे देखील वृत्त येऊ शकेल – सोनू निगम 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चर्चाना उधाण आले आहे. पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा वर आला आहे. एकाधिकारशाहीविरुद्ध आवाज उठवला जात आहे. आता गायक सोनू निगम यांनी देखील यावर एक व्हिडीओ केला आहे. व तेही या विषयावर बोलले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी बॉलिवूडसोबत संगीतक्षेत्रातही हेच सुरु असून, माझ्या सोबत वाईट वागणूक केली होती तर नवीन येणाऱ्या तरुण कलाकारांची अवस्था काय होत असेल तुम्ही विचार करू शकता. असे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी यावेळी जर असेच वातावरण राहिले तर एखाद्या गायकाच्या आत्महत्येचे देखील वृत्त येऊ शकेल असे म्हंटले आहे.

सुशांतच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील काळी बाजू समोर आली आहे. आपल्या यु ट्यूब चॅनेलवरून हा V-LOG त्यांनी प्रदर्शित केला आहे. आणि आता ज्या नावाची चर्चा होते आहे त्यांनीच मला गाणे गाऊ देऊ नका असे अनेकांना सांगितले होते. आणि सध्या अरिजित सिंग सोबत हेच केले जात असल्याचे सांगितले आहे. काहीजण तर अक्षरशः मला बोलावून माझ्याकडून गाणे म्हणवून घ्यायचे आणि त्याचे पुन्हा डब करायचे. असे खूप प्रकार घडले आहेत. सध्या संगीत क्षेत्रात दोनच कंपन्या आहेत आणि ते ठरवतात कुणी गायचे आणि कुणी नाही. एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास देणे संगीतक्षेत्रातही सुरु आहे असे ते व्हिडीओ मध्ये बोलले आहेत.

संगीत क्षेत्रातील व्यावसायिकांच्या लॉबीविषयी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तरुण गायकांना या लॉबीचा मोठा फटका सहन करावा लागत असल्याचेही ते यामध्ये म्हणाले आहेत. गेल्या १५ वर्षात मला काम मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत पण मला काही फरक पडत नाही मी कुणाकडे काम मागायला जात नाही. माझे छान सुरु आहे असे ते म्हणाले. मात्र या क्षेत्रात येणाऱ्या नव्या कलाकारांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर संगीत क्षेत्रात नव्या कलाकारांसोबत अशी वागणूक दिली गेली, तर भविष्यात मोठा फटका सहन करावा लागत आहे. अनेकदा या क्षेत्रात पॉवरचा चुकीचा उपयोग केला जातो. असेही ते म्हणाले.

#SonuLiveD | VLog 46 | You might soon hear about Suicides in the Music Industry

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment