किसान सन्मान निधी योजनेत ‘हा’ बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था | मागील महिन्यांत मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारने किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच या योजनेला मंजुरीही मिळाली होती. या ‘किसान सन्मान निधी’ योजनेत काही बदल बदल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता मिळवण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली होती. मात्र आता दुसरा हफ्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ‘आधारकार्ड’ची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.सहा हजार रुपये तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमितपणे जमा होणारआहेत, याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा मिळवला आहे.

शेतकऱ्यांचा आधार कार्डवर चुकीचा तपशील असल्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे काढताना त्यांना अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने आधार कार्ड अनिवार्य नसल्याचा निर्णय घेतला. किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता म्हणून १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर महत्वाचे –

अल्पवयीन अनाथ मामेबहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा..

गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भाजप संगठन मेळाव्याला गर्दीच नाही ; दानवेंनी भाषण घेतले आटोपते…

Leave a Comment