देशात मागील २४ तासांत ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण, ३२५ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचे समोर येत आहे.

या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले असून ३२५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चिंताजनक म्हणजे भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत तब्बल ९ हजार ५२० रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दिलासादायक बातमी म्हणजे, भारतात कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णाच्या तुलनेत या गंभीर आजारावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ज्यामध्ये संपूर्ण देशात सध्या १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ६९ हजार ७९८ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सांगण्यानुसार, १५ जून सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल ५७ लाख ७४ हजार १३३ सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये १ लाख १५ हजार ५१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. याआधी भारताने चीनलाही मागे टाकले होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment