नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं आणखी वाढतच आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला दिसत आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांबरोबर कोरोनाच्या लढ्यातील योध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची लागण होत आहे. मागील २४ तासांत सीमा सुरक्षा दलाचे (BSF) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर ४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
In the last 24 hours, 53 more Border Security Force (BSF) personnel tested positive for #COVID19 and 4 have recovered. There are 354 active cases and 659 personnel have recovered till date: BSF pic.twitter.com/GM1w609FE6
— ANI (@ANI) June 30, 2020
सध्या उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, BSFकडून देण्यात आली आहे. या अगोदर काल २४ तासांत २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती. तर १८ जणांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, मागील २४ तासांत देशभरात १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत. देशभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”