Thursday, March 23, 2023

गेल्या २४ तासात राज्यातील ६७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

- Advertisement -

मुंबई । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं आणखी वाढ होत असताना राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला दिसत आहे.कोरोनाच्या लढ्यातील योध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान, कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आतापर्यंत  ४ हजार ८१० पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाविरुद्ध लढताना पोलीस अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. मागील चोवीस तासांत महाराष्ट्रातील पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

मागील २४ तासांत सीमा सुरक्षा दलाचे (BSF) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर ४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.सध्या उपचार सुरू असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, BSFकडून देण्यात आली आहे. या अगोदर काल २४ तासांत २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती. तर १८ जणांनी कोरोनावर मात केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”