देशभरात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ३९० नवे रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ५६ हजार पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना प्रादुर्भावा संदर्भातील मागील २४ तासाची आकडेवारी आज पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ हजार ३९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासातच १ हजार ३७३ रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे आजही कोरोनाच्या मृत्यू संख्येत वाढ कमी झाली नसल्याचे दिसून आलं आहे. मागील २४ तासात देशभरात कोरोनाची लागण होऊन १०३ जणांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत देशात कोरोनाबाधित मृतांची संख्या १ हजार ८८६ वर पोहोचलीआहे. देशात सापडणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी प्रत्येक ३ रुग्णांमधला एक रुग्ण बरा होतो आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

देशभरात असे २९ जिल्हे जिथे मागील २१ दिवसात एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ४२ जिल्हे असे आहेत जिथे २८ दिवसात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तर ४६ जिल्हे असे आहेत ज्यामध्ये मागील सात दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment