व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चिंताजनक! मागील ३६ तासात राज्यातील १८९ पोलीस कोरोनाबाधित, तर ४ जणांचा मृत्यू

मुंबई । लॉकडाउनकाळापासून कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसही महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या ३६ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ३ हजार १८८ जणांवर उपचार सुरू आहेत तर १९ हजार ३८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर २४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यात काल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. १९ हजार ९३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११ हजार ९२१ रुग्ण वाढलेयत. सोमवारी १८० जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३ वर गेला आहे. तर आजवर राज्यात कोरोनानं ३५ हजार ७५१ जणांचा बळी गेला आहे. १० लाख ४९ हजार ९४७ जण आजवर राज्यात कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.