अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
जिल्ह्यातील परतवाडा येथे आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये परतवाड्यात नागरिकांनी ३०० फुटांचा झेंडा घेऊन परतवाड्यातून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यामध्ये नरेंद्र मोदी जिंदाबाद! अमित शहा जिंदाबाद! भारत माता की जय! अशा घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीमध्ये डॉक्टर,वकील व्यापारी,विद्यार्थी, महिलांसह विविध सामाजीक संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. या रॅली दरम्यान अचलपूर परतवाडा शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. मागील २ दिवसांत जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लोक अजूनही रस्त्यावर उतरत असल्याचं पहायला मिळत आहे.