‘या’ देशात केळी 3300 रुपये किलो तर चहा 5200 रुपयांना विकला जात आहे, कॉफीच्या किंमती ऐकून आपल्याला धक्काच बसेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण अशा देशाची कल्पना करू शकता. जो एकीकडे दररोज अणु-समृद्ध होण्यासाठी क्षेपणास्त्रांची चाचणी करतो मात्र दुसरीकडे तेथे उपासमार होण्यासारखी परिस्थिती आहे. उत्तर कोरियाची स्थिती काहीशी अशीच आहे. उत्तर कोरियामधील अन्नसंकट (Food crisis) इतके खोलवर गेले आहे की, तिथे खाण्या- पिण्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. तिथे एक किलो केळीची किंमत 3335 रुपये आहे यावरूनच आपण तेथील महागाईचा अंदाज लावू शकतो.

गेल्या काही दिवसांत लाखो लोकांना अन्नही मिळालेले नाही, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) याने पहिल्यांदाच मान्य केले आहे की, आपल्या देशात अन्नाचा तुटवडा तीव्र जाणवत आहे.

‘या’ कारणास्तव तेथे महागाई आहे
किम जोंगने आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले की,”गेल्या वर्षी झालेल्या वादळांमुळे शेती क्षेत्र धान्य उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकले नाही. उत्तर कोरियामधील हे उपासमारीचे संकट कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवले आहे. उत्तर कोरियाने शेजारच्या देशांसह आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या. यामुळे त्याचा चीनबरोबरचा व्यापारही कमी झाला.

कॉफीची किंमत जाणून घ्या
उत्तर कोरिया खाद्यपदार्थ, खते आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार उत्तर कोरियामध्ये एक किलो केळी 45 डॉलरपेक्षा जास्त म्हणजे 3300 रुपयांत उपलब्ध आहे तर चहापुडीची किंमत 70 डॉलर म्हणजेच 5200 रुपये आहे आणि एका कप पॅकेट कॉफीची किंमत 100 डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 7300 रुपये आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment