टोक्यो ऑलम्पिकमध्ये ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार ध्वजवाहकाचा मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टोक्यो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्तीचे प्रयत्न करून ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा केली आहे. तसेच भारताने देखील आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या ऑलम्पिकच्या उद्घाटनावेळी ध्वजवाहकाचा मान दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना देण्यात आला आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कुस्तीपटू बजरंग पुनिया यालादेखील 8 ऑगस्ट रोजी टोक्यो ऑलम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच एक नाही दोन ध्वजवाहक
ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असणार आहेत. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याला मान देण्यात आला होता.

भारतासाठी ऑलम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला
दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. मेरी कोमने 2012 साली ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. 38 वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदके मिळवून दिली आहेत. तिचे वय लक्षात घेता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणार हे नक्की.

Leave a Comment