Saturday, March 25, 2023

लायन्स क्लब आँफ कराडचा पदग्रहण सोहळा संपन्न, अध्यक्ष खंडू इंगळे यांचा सत्कार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील लायन्स क्लब आँफ कराडचा यावर्षीचा पदग्रहण सोहळा पंकज हॉटेल येथे कोरोनाचे नियम पाळून उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी खंडू इंगळे यांची निवड झाली आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर यांची उपस्थित होते.

- Advertisement -

या कार्यक्रमास लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजीराव फडतरे, राकेश साळुंखे, जगदीश पुरोहित याच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला क्लबचे माजी प्रांतपाल विजयकुमार राठी यांनी 2021-22 चे नूतन अध्यक्ष खंडू इंगळे व त्यांचे संचालक सदस्य यांना यावेळी शपथ दिली. तसेच येथील इतर पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी सांगून कामाचे स्वरूप सांगण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत नूतन अध्यक्ष खंडू इंगळे व संचालक सदस्याना यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी दिपक प्रभावळकर म्हणाले, लायन्स क्लब ही 210 पेक्षा अधिक देशात कार्यरत असलेली सर्वात मोठी सामाजिक संघटना आहे. कराडच्या क्लबला 54 वर्षाची परंपरा आहे. यावर्षीच्या अध्यक्षपदी एका पत्रकाराची निवड झाली, याचा मला विशेष आनंद आहे. येत्या काळात सामान्य लोकांसाठी असे काम करा की त्याची दखल लायन्सच्या माध्यमातून इतर देशात सुद्धा घेतली गेली पाहिजे. लायन्सने कराडला मोठे काम उभारले असून कोविड काळात देखील या क्लबचे काम वाखाणण्याजोगे झाले आहे. यावेळी शहर व परिसरात राबवता येतील असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी यावेळी सुचवले व क्लबकडून यावर्षी ते पूर्णही होतील अशी आशा व्यक्त करत त्यासाठी माझ्याकडून भविष्यात लागेल ते सहकार्य मी देईन अशी ग्वाही दिली. सुत्रसंचालन राजेश शहा, जितेंद्र ओसवाल यांनी केले. आभार मिलिंद भंडारे यांनी मानले.