मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत ; कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंक आजपासून खुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आर्थिक राजधानी मुंबईत अनेक विकासकामांचा सपाटा सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे कारण कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी या मार्गाचे उदघाटन होणार असून या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात करता येणार आहे. या मार्ग बाबतची विशेष बाब म्हणजे दक्षिण मुंबई पासून वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत चा मार्ग हा सिग्नल मुक्त असणार आहे. त्यामुळे हा प्रवास वेगवान होणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोस्टल रोड आणि सीलिंग कनेक्ट झाल्यामुळे वरळीच्या बिंदू माधव चौकात होणारा वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे आज उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे या नवीन मार्गामुळे बारा मिनिटांमध्ये प्रवास करण्यात येईल असा दावा करण्यात येतो आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार असून इंधनाची देखील बचत होणार आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका

या प्रकल्पाबाबत अधिक सांगायचं झाल्यास या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला 136 मीटरचा पट्टा सर्वात मोठ्या बो स्टिंग आर्च गर्डरला जोडण्यात आला आहे 2000 मेट्रिक टन वजनाचा महाकाय गरडर जोडण्यात आला असल्यामुळे या प्रकल्पामुळे आता कोस्टल रोड सी लिंक ला वरळी इथं जोडला गेल्यामुळे वांद्रातून दक्षिण मुंबईत प्रवास वेगानं करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओवर ते वरळी सीलिंग असा 10.58 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव ते हाजीवली पर्यंत ६.२५ किलोमीटरचा मार्गही सुरू करण्यात आला आहे तर याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किलोमीटर लांबीचा वांद्रे वरळी सीलिंग जोडण्यात आला आहे त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे