कराड | महाराष्ट्र राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या हामस्टर लॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. मार्च महिन्यात भूमिपूजन झालेल्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मौजे ग्रामपंचायत बनवडी कराड कॉलेज परिसर व इतर भागातील कोपर्डे हवेली फिडर व जोडण्यात आले. त्यामुळे नदी पाणीपुरवठा योजना वीज खंडित झाल्यामुळे जो कृत्रिम पाणीटंचाई जाणवत होती. त्यापासून बनवडी ग्रामपंचायची सुटका व पाण्याची मोठी समस्या दूर झाली आहे.
योजनेच्या थकीत बिलापोटी एक लाख रुपये धनादेश या कार्यक्रमाला देण्यात आला. कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कंपनी.कराड रवींद्र बुंदेले यांच्याकडून सौर ऊर्जा करण्यासाठी बनवडी ग्रामपंचायतीला परिपूर्ण सहकार्य करणार असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग कराड शहर अजित नवाळे, पंचायत समिती सदस्य वैशाली वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सहाय्यक अभियंता ओगलेवाडी शहर तुषार खराडे, कनिष्ठ अभियंता ओगलेवाडी ग्रामीण आशिष यादव, कनिष्ठ अभियंता ओगलेवाडी ग्रामीण निखिलेश ब्रद्णी, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, अख्तर बालेखान, अलका पाटील, विद्या शिवदास, पूजा चव्हाण, स्वाती गोतपागर, पल्लवी साळुंखे, अश्विनी विभुते, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुकले आदी उपस्थित होते.