सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भारतीय सैन्यदलापुढे शिवछत्रपतींचा आदर्श आहे. आपले सैन्यदल जगात नावाजलेले एक उत्तम सैन्यदल आहे. देशाची देशसेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सशस्त्र सैन्यदलात सामील व्हावे असे आवाहन माजी मेजर जनरल विजय पवार यांनी केले.
रहिमतपूर येथे रहिमतपूर पंचक्रोशी मराठा बिझनेस फोरम शाखेचे उद्घाटन तसेच रहिमतपूर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थातील आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी एन डी ए. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, एस पी. आय. औरंगाबाद , एस पी. पी. नाशिक याबाबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आॅफिसर बनण्यासाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम, सौ. उषा पवार, माजी आयकर आयुक्त एम बी एफचे एक्झिक्यूटिव्ह प्रेसिडेंट अरुण पवार व हैदराबाद येथील एम बी एफचे संस्थापक व चेअरमन अगरवाल इंडस्ट्रीज बॉम्बेचे एम. मधू, सातारा जिल्हा बिझनेस फोरमचे युवा उद्योजक मनोज देशमुख, मराठा फोरमचे जगदीशभाऊ शिर्के, सक्सेस अॅबकसचे मालक किरण पाटील, एम बी एफ चे सदस्य राजेंद्र साबळे, रहिमतपूर येथील मराठा बिझनेस फोरमचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन कदम, सचिव अच्युतराव माने यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सौ. चित्रलेखा माने – कदम म्हणाल्या की, मराठा बिझनेस फोरम हा आपल्या सर्वांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उदात्त होते. आपण सर्वजण छत्रपतींचा विचार मानतो. या विचारांनी पुढे जातो. असा विचार ज्यांचा ज्यांचा आहे तो प्रत्येक जण मराठा. अशा या उदात्त विचारसरणीने आपण एकत्र काम करुया. एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊया. मुलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एन डी ए, एस पी आय, एस पी पी अशा परीक्षेचे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मुलांचे भवितव्य उज्ज्वल बनेल. यावेळी अरुण पवार, मनोज देशमुख, अच्युतराव यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते मराठा बिझनेस फोरम रहिमतपूर शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या फोरमच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन कदम व सचिवपदी अच्युतराव माने सर यांची निवड करण्यात आली.
यावेळी पाहुण्यांचा हस्ते रहिमतपूर शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शिवराज माने, दत्तात्रय जाधव, नितीन जाधव, धनंजय माने, उदयन माने, विजय चव्हाण, सूर्यकांत पवार, वैभव माने, सतिश आडेकर, नितीन भोसले, संतोष नाईक या मराठा उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठा बिझनेस फोरमचे संस्थापक अध्यक्ष, मराठा महासंघाचे संस्थापक ॲड. शशिकांत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सतिश आडेकर यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. डॉ. सुनंदा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. मराठा बिझनेस फोरम रहिमतपूर शाखेचे अध्यक्ष हर्षवर्धन कदम यांनी आभार मानले. पंचक्रोशी शिक्षण मंडळ व मराठा बिझनेस फोरम रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माने, सचिन बेलागडे, विक्रम माने, बेदील माने, जयवंत माने यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, सर्व शाळांतील एन. सी. सी. कॅडेट, विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.