औरंंगाबाद : ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी व कर्मचायांच्या मुलांनी स्वयंभु अभ्यासिकेचा उपयोग चांगल्या ज्ञानार्जनासाठी करावा असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. पोलिस पाल्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी यासाठी पोलिस वसाहतीत स्वयंभु अभ्यासिका उभारण्यात आली असून या अभ्यासिकेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२५) ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिसांचे पाल्यांना या स्पर्धेच्या युगात अभ्यासाला अनुकूल असे शांत आणि चांगले वातावरण मिळावे या दृष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पुढाकार घेत पोलिस वसाहत परिसरात सुसज्ज अशी स्वयंभू अभ्यासिका उभारली आहे. पोलिसांच्या कुटूंबातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाNया विद्याथ्र्र्यासह, शैक्षणिक परिक्षांना सामोरे जाणाNया विद्यार्थांना सुध्दा या अभ्यासिकेचा लाभ होईल. याचप्रमाणे खात्याअंतर्गत सेवा परिक्षेचा अभ्यास करणारे पोलिस अंमलदार यांना या अभ्यासिकेच्या माध्यमांतुन सुसज्ज अशी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वयंभू अभ्यासिका उभारण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, पोलिस उपअधीक्षक पुजा गायकवाड, पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक संजय निर्मळ, सहायक निरीक्षक गणेश सुरवसे, सहायक फौजदार विजयकुमार मारकळ, लक्ष्मण पांढरे, जमादार विनोद पदमणे, पांडूरंग शिंदे, आशा बांगर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
अभ्यासिकेत पुरेशी पुस्तके उपलब्ध
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्याथ्र्यांना लागणारी सामान्य ज्ञानाची पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, राष्ट्रपुरूषांची आत्मचरित्रे, देश-विदेशातील इंग्रजीचे शब्दकोष आदी पुस्तके या स्वयंभु अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच विविध मासिके, दैनिक वर्तमानपत्रे देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.