काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असला तरी, या निवडणुकीत काँग्रेसला राजस्थानमधील जालोर येथे मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. या पराभवाचा धडा घेण्यासाठी आणि पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रदेश प्रचारक विवेक बंसल यांच्या उपस्थित एक जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. कॅमेऱ्याची आपल्यावर नजर आहे हे विसरून दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांना लाथा, बुक्क्या, हाती येईल त्या वस्तूने मारताना दिसतात.

एका बंद खोलीत विवेक बंसल बैठकीत असताना बाहेर मात्र काही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. बंसल यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि बैठक पुर्वत केली. परंतू यानिमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे परिसरात बोलले जात होते.

सोमवारी बैठकीसाठी दुपारी साडेबारा वाजता प्रचारक विवेक बंसल, पर्यावरण मंत्री सुखराम बिश्नोई जालोर येथे पोहोचले. राजीव गांधी भवनमध्ये कार्यकर्त्यांशी संवाध साधण्यासाठी बंसल एका खोलीत गेले आणि कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलावू लागले. दुपारी चार वाजता 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार उमसिंह चांदराई बैठकस्थळी आले. याच ठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ. समरजीतसिंह, रतन देवासी, उपाध्यक्ष सोहनसिंह देवड़ा यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि पुढील चर्चेसाठी बंसल यांच्या खोलीत गेले. परंतु या दरम्यान बाहेर उभे असलेल्या माजी पदाधिकारी देराम बिश्नोई यांनी घोषणाबाजी केली. जे काँग्रेसचे नाहीत ते चर्चेसाठी आत का जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे उमसिंह यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.

Leave a Comment