उच्च रक्तदाब नियंत्रित करायचाय? आहारात समाविष्ट करा ही 5 फळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जगात उच्च रक्तदाब, किंवा हायपरटेन्शन, एक गंभीर अन वाढती समस्या बनली आहे. विविध कारणांमुळे हायपरटेन्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, पण यावर नियंत्राण मिळवण्यासाठी फळांचा प्रभावी वापर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा ठरतो. फळांमध्ये असलेले नैसर्गिक घटक, विशेषतः व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबर्स, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित फळांचा समावेश केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे रक्तदाब स्थिर राहतो.

केळी –

केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करतो.

संत्रे –

संत्रे मध्ये असलेले व्हिटॅमिन C, फ्लेवोनॉयड्स आणि पोटॅशियम ह्यामुळे रक्तदाबावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे हृदयाच्या आरोग्याचा समर्थन होतो.

द्राक्षे

अंगूर (द्राक्षे )मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यातल्या रेस्वेराट्रोल आणि फ्लेवोनॉयड्स हृदयाच्या आरोग्यासाठी लाभकारी असतात.

डाळिंब

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स अन पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते . हे फळ खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते अन कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवते. तुम्ही जर दररोज डाळिंबाचा रस पिला तर हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पपई

पपई मध्ये असलेल्या व्हिटॅमिन C, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आदर्श आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो –

फळांचा समावेश आपल्या आहारात नियमितपणे करणे, आणि त्यासोबतच ताज्या फळांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. “दैनिक आहारामध्ये फळांचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. तसेच, तंबाखू आणि मद्यपान करू नये , आणि नियमित व्यायाम हे देखील महत्त्वाचे आहे,”