आहारात ‘या’ फळाच्या सालीचा करा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे आपण कधीकधी अनेक पदार्थ हे चुकीच्या पद्धतीने खात असतो. अनेक वेळा ज्या भाज्यांचा उपयोग जेवणामध्ये केला जातो त्या फळभाज्या अनेक वेळा वरच्या सालीसोबत न खाता साल काढून खाल्ल्या जातात. हि अशी अनेक फळे आहेत कि, ते फळे खाताना साल न काढता खाल्ली गेली पाहिजेत

बीट हे फळ आहे त्याचा वापर आपण आपल्या आहारात करायला हवा. बिट खाताना कधी सुद्धा साली काढू नयेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम , आणि लोह याचे प्रमाण असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. बिट सालीसकट खाण्याने आपली पचन शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बीट खाताना स्वच्छ धुवून खावेत.

खरबूज खाण्याने शरीरातील बुद्धकोष्टिता कमी होण्यास मदत होते. टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी हे जास्त प्रमाणात असते. टरबूज खाण्याने चेहरा निरोगी राहतो. तसेच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. बटाटा हा सालीसकट खाल्याने शरीराला अनेक पोष्टक घटक त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. तंतुमय पदार्थ आणि क्षार मिळतात.

गाजर खाताना नेहमी सालीसकट खाल्ले जावे कधी कधी काही प्रमाणात चमच्याने साल काढून खाल्ले तरी चालतील . गाजराच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे असतात. साल काढल्याने त्याच्यातील काही पौष्टिक घटक नाहीसे होतात.  काकडीची साल काढून अनेक जणांना खायला आवडते. परंतु काकडीच्या सालींमधे मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे ती खाताना नेहमी साल न काढता खाल्ली गेली पाहिजे त्याने आपल्या प्रतिकार शक्तीत वाढ होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment