औरंगाबाद |गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 19 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 772 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 220 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 62 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 17 आणि ग्रामीण मधील 45 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा, कैलासनगर, शिवाजी कॉलनी याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण तर वेगवेगळ्या भागात 9 रुग्ण आढळले आहे.
ग्रामीण भागातील गंगापूर कन्नड सिल्लोड येथे प्रत्येकी 2 तर वैजापूर 10 रुग्ण आढळले आहे.
उपचार सुरु असताना वैजापूर येथील 66 वर्षीय पुरुष, आणि बंजारा कॉलनीत 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.