देशभर आयकर विभागाचे छापे : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव मुख्य निशाण्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदोर  । लोकसभा निवडणुकीच्या मध्यात आयकर विभागाने देशभर छापारामारीचे सत्र आरंभले आहे. देशात जवळपास ५० ठिकाणी छापा टाकण्याचे काम आयकर विभागाने आज रविवारच्या पहाटेपासून पूर्ण केले आहे. दिल्ली येथील आयकर विभागाने मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कर यांच्या घरावर छापे टाकून सुमारे ९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्रवीण कक्कर यांच्या इंदूर येथील राहत्या घरी रविवारी पहाटे ३च्या सुमारास हा छापा टाकण्यात आला आहे.

प्रवीण ककर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आयकर विभागाला संशय आहे.त्यामुळे यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याबरोबर प्रवीण कक्कर यांची मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. कर्तव्य दक्ष अधिकरी म्हणून प्रवीण कक्करयांचा लौकिक आहे.मागील काळात त्यांना राष्ट्रपती पदक देवून सन्मानित देखील करण्यात आले आहे. प्रवीण कक्कर यांच्या घरी आयकर विभागाच्या १५ अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात ९ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे ५० ठिकाणी छापे टाकले गेले.प्रवीण कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्या घरावर देखील आयकरविभागाने छापे टाकले आहेत. इंदोर भोपाल गुजरात गोवा या ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकण्याची कार्यवाही केली आहे.

 

Leave a Comment