Income Tax Portal : आता टॅक्स भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही, मेंटेनन्स नंतर लाइव्ह झाले टॅक्स पोर्टल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पोर्टलमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे नवीन आयटी पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून ‘अनुपलब्ध’ राहिल्याने, इन्फोसिसने रविवारी रात्री उशिरा सांगितले की, त्याची आपत्कालीन देखभाल पूर्ण झाली आहे आणि आता ते उपलब्ध आहे. तत्पूर्वी, अर्थ मंत्रालयाने पोर्टल बनवणाऱ्या इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना सोमवारी बोलावले आहे.

पारेख यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले गेले आहे. इन्फोसिसने विकसित केलेले नवीन आयटी पोर्टल www.incometax.gov.in 7 जून रोजी सुरू करण्यात आले. पोर्टलमध्ये सुरुवातीपासूनच समस्या येत आहेत. युझर्स सतत तक्रार करत असतात की, एकतर पोर्टल उपलब्ध नाही किंवा ते अत्यंत संथ गतीने काम करत आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केलेल्या एका ट्विटमध्ये सांगण्यात आले की,” शनिवारपासून हे पोर्टल उपलब्ध नाही.”

पोर्टलने रविवारी संध्याकाळपासून सुरळीत काम सुरू केले
इन्फोसिस इंडिया बिझनेस युनिटच्या ट्विटर हँडल ‘इन्फोसिस इंडिया बिझनेस’ ने रविवारी संध्याकाळी ट्विट केले की,” इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलचे आपत्कालीन देखभालीचे काम पूर्ण झाले आहे आणि आता हे पोर्टल पुन्हा उपलब्ध झाले आहे. करदात्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

अर्थमंत्र्यांनी प्रश्न विचारले
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पोर्टलमध्ये सतत समस्या असताना, अर्थ मंत्रालयाने पोर्टल बनवणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना बोलावले आहे. पारेख यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले गेले आहे. पोर्टलवर दोन महिन्यानंतरही समस्या का येत आहेत आणि त्या का सोडवल्या जात नाहीत, हे त्यांना अर्थमंत्र्यांना सांगावे लागेल.

Leave a Comment