Wednesday, February 8, 2023

जरंडेश्वरसह राज्यातील 5 साखर कारखान्यावर आयकर विभागाची छापेमारी; अजितदादांच्या निकटवर्तीयांना झटका??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना यापूर्वी सील केलेला आहे.

- Advertisement -

दरम्यान, छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही म्हणायच नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे. कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो. याचा राज्यातील जनतेने विचार करावा, असे अजित पवार म्हणाले.