हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Income Tax Rules) भारतात गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. यातील बरेच गुंतवणूकदार हे इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त सोने खरेदी,मध्ये रस दाखवतात. त्यामुळे बहुतेक लग्न, समारंभ, सोहळे, उत्सव, सण या कालावधीत भारतात सर्वाधिक सोन्याची खरेदी केली जाते. अनेक भारतीय सोने खरेदीला भविष्यासाठी केलेली सुरक्षित गुंतवणूक असे म्हणतात. लोकांची सोने खरेदीतील आवड पाहता गेल्या काही काळामध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामध्ये सार्वभौम सुवर्णरोखे गोल्ड, म्युच्युअल फंडचे गोल्ड फंड, गोल्ड ईटीएफ यांचा समावेश आहे.
(Income Tax Rules) मात्र असे असूनही काही लोक सोने खरेदी करून घरीच ठेवतात. यामागे काही कुटुंबाच्या परंपरा आणि रीतीभाती हे कारण असते. मात्र, घरात सोन्याचे दागिने किंवा कोणत्याही स्वरूपातील सोने नियमापेक्षा जास्त आढळ्यास इनकम टॅक्सची करडी नजर पडण्याची शक्यता असते. यासाठी सीबीडीटीच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
सीबीडीटीच्या सूचना
सोन्याचे दागिने किंवा कोणत्याही स्वरूपातील सोने घरात ठेवण्याची अनेक कुटुंबांची जुनी आणि वंशागत परंपरा आहे. मात्र, सोने खरेदी केल्यानंतर ते घरातच ठेवायची सवय नडू शकते. (Income Tax Rules) आयकर छाप्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सोने घरात सापडल्यास ते जप्त केले जाऊ शकते. त्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने (Central Board Of Direct Taxes) १९९४ मध्ये एक सूचना जारी केली होती. ही सूचना आयकर अधिकाऱ्यांसाठी केली गेली होती.
यामध्ये म्हटले होते की, छाप्यांदरम्यान सोन्याचे दागिने किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील सोने एका ठराविक रकमेपर्यंत आढळून आल्यास ते जप्त करू नये. यासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी प्रमाणाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. घरात किती सोने ठेवावे? याविषयीच्या मर्यादेबाबत माहिती घेऊया.
किती मर्यादा आहे? (Income Tax Rules)
सीबीडीटीच्या निर्देशानुसार, कोणत्याही विवाहित महिलेकडे ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले तर ते आयकर अधिकारी जप्त करणार नाहीत. तसेच अविवाहित महिलेकडे २५० ग्रॅम पर्यंतचे सोन्याचे दागिने सापडल्यास ते देखील जप्त होणार नाहीत. याशिवाय विवाहित किंवा अविवाहित पुरुष सदस्याकडे १०० ग्रॅम पर्यंतचे सोने असल्यास जप्त होणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
लक्षात घ्या वरील प्रमाण मर्यादा ही कुटुंबातील एका सदस्यासाठी आहे. (Income Tax Rules) याचा अर्थ असा की, एका कुटुंबात जर २ विवाहित महिला असतील तर एकूण मर्यादा ५०० ग्रॅम अधिक ५०० ग्रॅम अशी मिळून थेट १ किलोग्रॅम पर्यंत वाढते. त्यामुळे सीबीडीटीच्या निर्देशांचे पालन केल्यास सोन्याच्या दागिन्यांवर जप्तीची प्रक्रिया होण्यापासून तुम्ही वाचू शकता.
… तरच सुटका अन्यथा,
नियमात राहूनही एखाद्या घरात ठेवलेल्या सोन्याबाबत काय कारवाई करायची? हे मूल्यमापन आयकर अधिकाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या कुटुंबाचे रीतिरिवाज किंवा धार्मिक श्रद्धेनुसार उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त सोने असल्याची खात्री झाल्यास तो कोणतीही कारवाई करणार नाही. तसेच, घरात सापडलेले सोन्याचे दागिने कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावर असतील तर जप्ती होणार नाही. मात्र तुमच्या घरात इतर कोणाचे सोने किंवा दागिने सापडले तर मात्र त्यावर येणारी जप्ती कोणीच थांबवू शकत नाही. (Income Tax Rules)