Income Tax | 2024 चा ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ झालेली आहे. 31 जुलै 2024 ही ITR भरण्याची शेवटची तारीख आहे 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात प्राप्तीकरासाठी काही सवलत मिळेल का? याबाबत अनेक लोकांना अपेक्षा आहेत. आणि त्यामुळे सध्या सगळेजण बजेटची वाट पाहत आहेत. परंतु असे अनेक लोक आहेत, ज्यांना असा प्रश्न पडतो की आपण कष्टाने पैसे कमवतो. त्यावर सरकार कर का वसूल करते? सरकार आपल्या मेहनतीच्या पैशांमध्ये वाटा का घेते? या बदल्यात त्यांना काय मिळते याबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत.
आयकर (Income Tax) हा कराचा एक प्रकार आहे जो सरकार त्यांच्या अधिकारक्षेत्रातील व्यवसाय आणि व्यक्तींच्या उत्पन्नावर गोळा करते. आयकराबाबत नियम आणि कायदे निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार करदात्याने त्याचे कर दायित्व निश्चित करण्यासाठी आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.
सरकार तुमच्या कमाईत वाटा का घेते? | Income Tax
तुम्ही मेहनत करून जे पैसे कमावता, त्याचा हिस्सा सरकार आयकराच्या रूपात जमा करते. तुम्हाला तुमच्या कमाईवर आयकर भरावा लागेल. मात्र, त्यासाठी स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारला आयकरातून 14 लाख कोटी रुपये मिळाले होते. तर त्या काळात अंदाजे ६ कोटी भारतीय नागरिकांनी आयकर रिटर्न भरले होते. वर्षानुवर्षे आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि त्याचप्रमाणे लोकांचे उत्पन्नही वाढते. मात्र, सरकार सर्वांकडून कर वसूल करते, असे नाही. ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांनाच आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. यासाठी आयकर स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत.
सरकार आयकर कमाईचे काय करते?
आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यातून मिळणारे उत्पन्न हे विकासकाम, प्रशासन चालवणे, विविध योजना, पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा इत्यादींसाठी वापरते. आयकर भरणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. कर भरून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करता. आयकरातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच देशात विकासाची कामे केली जातात. तुमच्यासाठी तो आम्ही आणि तुम्ही वापरत असलेले चांगले रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधा, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, सुरक्षा अशा अनेक योजनांवर खर्च केला जातो.
कर व्यवस्था काय आहे?
सध्या भारतात दोन कर प्रणाली आहेत. नवीन कर व्यवस्था आणि जुनी कर व्यवस्था. नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये 80C, 80D सारख्या कर कपाती उपलब्ध आहेत. 2023 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली डीफॉल्ट बनविण्याची घोषणा केली, त्यानंतर सर्व करदात्यांना जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर प्रणाली यापैकी एक निवडणे अनिवार्य झाले.