वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या अडचणीत वाढ : प्रांताकडून कारवाईची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

वाई नगरपरीषदेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाईचे प्रांत यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असलेबाबत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ याच्यावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे खातेनिहाय कारवाई सुरु करण्याबाबचा प्रस्ताव वरीष्ठांना सादर करण्यात येणार असल्याची नोटीस वाई प्रातांनी वाईच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांना दिली आहे. नगरविकास विभागाकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमीरा मागे असताना पुन्हा प्रांतानकडून खाते कारवाईच्या नोटीशीने अडचणीत वाढ झाली आहे.

प्रशासकीय कामकाज करीत असताना वरीष्ठांनी आवश्यक अहवालाची कार्यवाहीबाबत सुचित केले असताना मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ गांभीर्यपूर्वक कामकाज करीत नाही. विविध मान्यवरांच्या कार्यक्रम दाैरा संपन्न झाला. त्यावेळी मुख्याधिकारी या नात्याने राजशिष्टाचार म्हणून आवश्यक कार्यावाहीबाबत हजर न राहील्याबाबत तसेच मान्यवराच्या दाैऱ्याबाबत वाई नगरपरीषदेच्या हद्दीतील रस्त्यावरून खड्डे, साईड पट्ट्या दुरुस्त करणे, स्वच्छता करणे याबाबत मुख्याधिकारी पोळ याच्याकडून कार्यवाही होणे आवश्यक होते. तरीही मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ याच्याकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले आहे.

प्रशासकीय महत्त्वाच्या कामकाजाच्या दृष्टीने कार्यालयात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या बैठकीत सतत हजर राहण्याचे कळवून देखील बैठकीस सतत गैरहजेरीमुळे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ प्रशासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा करत असल्याचे स्पष्ट मत दिलेल्या नोटीशीत वाई प्रातांनी व्यक्त केले आहे. तरी वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता मुख्याधिकारी यांच्याविरोधात खाते कारवाई सुरु करणेबाबतचा प्रस्ताव विरीष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याविरोधात उपनराध्यक्ष अनिल सांवत याच्या तक्रारीवरुन विविध कामामध्ये अनियमितता व कर्तव्यात कसुर केल्याबाबत चैाकशी सुरु असताना, वाई नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची खाते कारवाईची सुरु करण्याचा वरिष्ठांना सादर करणारा प्रस्तावातील प्रातांच्या नोटीशीने अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Comment