सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होशील असे वाटले होते. मात्र, जिल्ह्यात आता कोरोना बाधितांच्या संख्येत वाढत लागली होती. त्यामध्ये बुधवारी पुन्हा वाढ झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 879 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 674 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 472 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 88 हजार 768 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 75 हजार 865 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 255 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 12 हजार 159 जणांचे नमुने घेण्यात आले.
राज्यात एका दिवसात विक्रमी लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. काल एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.