सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात 1 हजार 170 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 451 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 493 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 99 हजार 488 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 85 हजार 820 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 494 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 26 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. मात्र, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच तोटा सहन करावा लागत आहे. अशात आता कुठे नियमांमध्ये शिथिलता होती. ती सुद्धा काढून घेतली जात असल्याने याबाबत व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यासह कराड तालुक्यातील व्यापारीही आक्रमक झाले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जिल्ह्यात मध्यन्तरीच्या काळात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील र्निबंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.