औरंगाबाद : शहरातील तब्बल पाच दुचाकी लंपास झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील पंधरा दिवसात या घटना घडल्या. एकीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना, ठिकठिकाणी नाकाबंदी करूनही चोरीच्या घटनात वाढ झाली आहे.
पहिल्या घटनेत 15 मे च्या रात्री छावणीतील दिलीप कुमार तिवारी (रा.नंदनवन कॉलनी) यांनी बिल्डर हाउसिंग सोसायटी च्या धनलक्ष्मी अपार्टमेंट येथे पार्किंग मधून दुचाकी (एम एच 20 बीपी 3678) पार्क करून ठेवली असता चोरट्याने लंपास केली. दुसऱ्या घटनेत शेख इमरान शेख बापूजी (रा. भावसिंगपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच 20 डिपी 0835) चोरट्याने 16 मे रोजी सकाळी गोल्डन सिटी भावसिंगपुरा येथील राहत्या घरासमोरून लंपास केली. तिसऱ्या घटनेत नरेंद्र भालेराव (रा. बन्सीलालनगर) यांनी घाटीतील पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी (एमएच 20 बीएम 5477) 12 मेरोजी सकाळी चोरट्याने लांबवली. चौथ्या घटनेत मोहम्मद शाहिद मसूद शेख (रा. छावणी) यांनी दुचाकी (एमएच 20 सीव्ही 4786)14 मे रोजी सकाळी पंचक्की जवळील जमीलबेग बाशिदिसमोरून चोरट्याने लांबवली.
पाचव्या घटनेत शाहिद अली शौकत अली सय्यद (रा. सुभेदारी विश्रामगृह) यांची दुचाकी (एमएच 20 बीझेड 8800) जुबली पार्क येथील मिड टाउन हॉल समोरून आज्ञाताने नेली. सहाव्या घटनेत सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल राव आनंदराव शिंदे (62, रा. प्रियदर्शनीनगर, नागेश्वरवाडी) यांची दुचाकी घरासमोरून उभी असताना 16 मे रोजी पहाटे चोराने हँडल लॉक तोडून लांबवली. सातव्या घटनेत सोनाली दादासाहेब गायकवाड (33, रा. शुभ लाभ अपारमेंट नक्षत्रवाडी) यांनी सिंधीशिरसगाव येथील पतीचे मित्र दत्तू शिवाजी सोनवणे यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच 20 एफई 9904) उभी केली होती, ती चोरट्याने 11 मे रोजी रात्री लांबवली. प्रकरणात अनुक्रमे छावणी पोलिस ठाण्यात दोन बेगमपुरा पोलिस ठाण्यात दोन तसेच इतर दोन असे सात गुन्हे दाखल करण्यात आले. दुचाकी चोरीचे हे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.