लॉकडाउन तरी पेट्रोल, डिझेलचे ‘भाव’ वाढले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नसताना लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. लॉकडाऊन वाढवला असला तरी परिस्थिती पाहून झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. एकीकडे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. अशावेळी कोरोनाच्या संकटकाळात राज्याचा आर्थिक गाडा कसा चालवायचा असा प्रश्न राज्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातूनच वाट काढत दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर १.६७ रू प्रती लिटरने वाढवण्याचा निर्णय घेतला असून डिझेलच्या दरात ७.१० रू प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या दरानुसार दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७१.२६रू प्रती लिटर तर डिझेलचे दर ६९.२९ रू प्रती लिटर इतके आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलची विक्री ६१ टक्के तर डिझेलची विक्री ५७ टक्क्यांनी घसरली. शिवाय इंधनांवर लागणारे कर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागालँड,आसाम आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. नागालँडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना टॅक्स लावण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment