अरररं…खतरनाक! हवेत उडी मारत विराटने पकडला भन्नाट कॅच; व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एडिलेड । भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही चर्चेत राहिला. पहिल्या दिवशी विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर आज कोहलीने एक भन्नाट कॅच पकडत आपल्या फिटनेस लेव्हलचा जणू काही दाखलाचं दिला. त्याचा या अफलातून कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. (india Vs australia test)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 233 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरीत करत कांगारुंना झटके दिले. एका बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी मानर्स लाबूशानेचा तब्बल 3 वेळा कॅच सोडला. बुमराह, साहा आणि पृथ्वीने गचाळ क्षेत्ररक्षण करत कॅच सोडले.

दरम्यान, रवीचंद्रन आश्विन सामन्याची 41 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फटका मारला. शॉर्ट मिड विकेटला विराट होता. आपल्या दिशेने येत असलेला चेंडू विराटने पाहिला. विराटला चेंडूपासून आपण दूर असल्याचं जाणवलं. विराटने वेळ न दवडता हवेत झेप घेतली अन अफलातून कॅच घेतला. विराटच्या कॅचच्या व्हिडिओला क्रिकेट फॅन्सची चांगली पसंती मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’