IND vs AUS:ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेइंग ११ मधून साहा, पृथ्वी शॉला डच्चू! तर ‘हे’ खेळाडू करणार डेब्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेलबर्न । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ शनिवारी मेलबर्नच्या मैदानावर उतरेल. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. या शिवाय चेतेश्वर पुजारा उप-कर्णधार असेल. (India Vs Australia Test Series 2020-21)

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या कसोटीत खेळलेल्या वृद्धिमान सहा आणि पृथ्वी शॉ यांना डच्चू देण्यात आला आहे. तर वृद्धिमान साहाच्या जागी ऋषभ पंत विकेटकीपर असेल. विशेष म्हणजे, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पन (Debut) करणार आहेत.

असा असेल भारतीय संघ (प्लेइंग-11)
अजिंक्या रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमन विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ सध्या मेलबर्नमध्ये आहे. येथे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) पुन्हा एकदा म्हटले आहे, की उत्तर समुद्र किनाऱ्यावर कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असतानाही भारत आणि आस्ट्रेलियादरम्यान खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच (SCG) खेळवला जाईल. याच बरोबर, कोरोनामुळे सिडनीतील स्थिती अधिक बिघडल्यास ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) तिसरा कसोटी सामना खेळविण्याचा विचार करत आहेत, असेही सीएने म्हटले आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment