IND vs AUS U19 WC Final : भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया U19 वर्ल्डकप अंतिम सामना Live कुठे पहाल?? पहा संपूर्ण डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IND vs AUS U19 WC Final : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया मध्ये अंडर 9 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे . दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर हा मुकाबला होणार असून वर्ल्डकप वर कोणता संघ आपलं नाव कॉर्नर याकडे सर्वांचे लक्ष्य असेल,. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असल्याने क्रिकेट प्रेमींना रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. कर्णधार उदय सहारन यांच्या नेतृत्वाखाली भारताने या विश्वचषक स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे. भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. त्यामुळे देशवासियांना आज मोठ्या अपेक्षा आहेत. आज आपण जाणून घेऊयात हा सामना किती वाजता सुरु होणार आहे आणि तुम्ही फ्री मध्ये कुठे तो लाईव्ह पाहू शकता ..

कुठे आहे सामना – IND vs AUS U19 WC Final

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना (IND vs AUS U19 WC Final) दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे

किती वाजता सुरु होणार सामना –

भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल.

कुठे लाईव्ह पाहता येणार –

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय मोबाईल वर तुम्हाला हा सामना पाहायचा असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

कसे असतील दोन्ही संघ –

भारतीय संघ – आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्या पांडे.

ऑस्ट्रेलिया संघ : ह्यू वॅबगेन (कर्णधार), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, टॉम कॅम्पबेल, राफेल मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बियर्डमन, कॅलम विडलर.