हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs Ban Test 2024) आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तासाभराच्या खेळातच कर्णधाराचा हा निर्णय बांग्लादेशच्या गोलंदाजांनी खरा करून दाखवला. कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे ३ फलंदाज एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले आहेत. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने संघाचा डाव सावरला आहे. लंच पर्यंत भारताने ३ बाद ८८ धावा केल्यात. बांगलादेश कडून हसन मोहमदने तिन्ही विकेट घेतल्यात.
हसन मोहंमद ठरला हिरो – IND vs Ban Test 2024
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने डावाची सुरुवात केली, मात्र कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात सपशेल अपयशी ठरला. रोहित केवळ 6 धावा करुन बाद झाला त्यात त्याने एक चौकार ठोकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिल कडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला भोपळाही फोडता आला आहे. हसन मोहमदच्या गोलंदाजीवर विकेटकिपर लिटन दासच्या हातात झेल देऊन गिल शून्यावरच बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहलीची साजेशी खेळी करू शकला नाही. रोहित प्रमाणे त्यानेही फक्त ६ चा धावा केल्या आणि हसन महमूदने त्याला बाद करत आपली तिसरी शिकार केली. IND vs Ban Test 2024
सुरुवातीलाच बसलेल्या या धक्क्यांमुळे टीम इंडियाची अवस्था एकवेळ ३४-३ अशी होती. मात्र अशावेळी सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि पाचव्या क्रमांकावर आलेला विकेटकिपर फलंदाज रिषभ पंत यांनी अधिक पडझड न होइउ देता धावफलक हलता ठेवला. यशस्वी जैस्वाल ६८ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे तर रिषभ पंत ४८ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.