सेहवागने लाईव्ह सामन्यात केले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य, कॉमेंट्रीमधून हटवण्याची करण्यात आली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यातली एजबॅस्टन टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची आघाडी 360 रनच्या पुढे पोहोचली आहे आणि टीमच्या हातात आणखी 3 विकेट शिल्लक आहेत. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रविवारी वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढावला आहे. सेहवाग (virender sehwag) सोनीसाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत आहे. सेहवागने (virender sehwag) विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. एवढच नाही तर अनेक यूजर्सनी त्याच्या या वक्तव्यामुळे सेहवागला (virender sehwag) कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 62व्या ओव्हरला मोहम्मद सिराजने मॅथ्यू पॉट्सला आऊट केलं, तेव्हा विराटने डान्स करून सेलिब्रेशन केलं. त्यावेळी सेहवाग (virender sehwag) कॉमेंट्री करत होता. ‘देखो छमिया नाच रही है’, असे सेहवाग यावेळी म्हणाला. सेहवागचं हे वक्तव्य काही मिनिटांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झालं.

Tweet

सेहवागला (virender sehwag) कॉमेंट्री पॅनलच्या बाहेर ठेवणं मला समजण्यापलीकडे आहे. सेहवागला काय बोलायचं हे कळत नाही, त्याची कॉमेंट्री खराब आहे. हिंदी कॉमेंट्रीचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. याचबरोबर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कोहली आणि बेयरस्टो यांच्यात बाचाबाची झाली होती. या दोघांमधला वाद वाढल्यामुळे दोन्ही अंपायरना हस्तक्षेप करावा लागला होता.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment