IND VS ENG: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली पोहोचले लॉर्ड्सवर, रवी शास्त्रींचे भवितव्य ठरवले जाणार !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. एकीकडे मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. एका रिपोर्ट नुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियापासून वेगळे व्हायचे आहे. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी भरत अरुण, आर श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनाही टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला निरोप द्यायचा आहे. शास्त्री आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय फक्त लॉर्ड्स कसोटीच्याच वेळी होईल, अशी बातमी आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह लॉर्ड्सवरच आहेत. अशी बातमी आली आहे की, हे दोघे रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमसोबत त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा करणार आहेत.

इनसाइड स्पोर्टच्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, या विषयावर आता काही सांगणे खूप घाईचे ठरेल मात्र बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव आणि इतर अधिकारी सध्या लंडनमध्येच आहेत. त्यामुळे ते शास्त्री आणि टीमसोबत त्यांच्या आणि संघाच्या भविष्याबद्दल निश्चितपणे चर्चा करेल. इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आली होती की,’ शास्त्रींनी बीसीसीआयच्या काही सदस्यांना टीम इंडियापासून वेगळे होण्याची माहिती दिली आहे. शास्त्रींचा करार नोव्हेंबरमध्ये संपत आहे. बीसीसीआयलाही नवीन कोचिंग स्टाफ हवा आहे, अशा बातम्या आहेत. अलीकडेच राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी -20 संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. मात्र, मालिका संपल्यानंतर, तो म्हणाला की,”एनसीएमध्ये तो जे करत आहे यावर तो आनंदी आहे.”

रवी शास्त्री यांचे कोचिंग करिअर
रवी शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने अनेक मोठी कामगिरी केली. भारताने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकल्या. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत वनडे आणि टी -20 मालिका जिंकली. या व्यतिरिक्त, संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. मात्र, भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. पुढील महिन्यात होणाऱ्या टी -20 विश्वचषकात टीम इंडिया चॅम्पियन बनेल अशी अपेक्षा आहे. शास्त्री जाणार असतील तर याहून चांगला गुडबाय काय असू शकेल.

Leave a Comment