इंग्लंडचा भारत दौरा : कधी-कुठे कसे पाहता येणार सामने ; चला जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी कोरोना विषाणू मुळे क्रिकेटला देखील फटका बसला होता. परंतु हे वर्ष  क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाचे असू शकते. आणि याची सुरुवात भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेपासून होणार आहे.

पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लडच्या संघाचं भारतामध्ये आगमन झालं आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे. पाहूयात वेळापत्रक, कधी-कुठे पाहता येणार सामना

पहिला कसोटी सामना – ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई (सकाळी ९:३० मिनिटांनी)

दुसरा कसोटी सामना – १३ ते १७ फेब्रुवारी – चेन्नई (सकाळी ९:३० मिनिटांनी)

तिसरा कसोटी सामना – २४ ते २८ फेब्रुवारी – अहमदाबाद (दिवस-रात्र) दुपारी दोन वाजता

चौथा कसोटी सामना – ४ ते ८ मार्च – अहमदाबाद (सकाळी ९:३० मिनिटांनी)

सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत

१२ मार्च – पहिला टी-२० सामना, (सायंकाळी सहा वाजता)

१४ मार्च – दुसरा टी-२० सामना, (सायंकाळी सहा वाजता)

१६ मार्च – तिसरा टी-२० सामना, (सायंकाळी सहा वाजता)

१८ मार्च – चौथा टी-२० सामना, (सायंकाळी सहा वाजता)

२० मार्च – पाचवा टी-२० सामना, (सायंकाळी सहा वाजता)

सर्व वन-डे सामने पुण्याच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत

२३ मार्च – पहिला वन डे सामना, (दुपारी अडीच वाजता)

२६ मार्च – दुसरा वन डे सामना, (दुपारी अडीच वाजता)

२८ मार्च – तिसरा वन डे सामना, (सकाळी साडेनऊ वाजता)

कुठे पाहाल सामने –

कसोटी सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर होणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेचं लाइव्ह प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दाखवलं जाणार आहे.

ऑनलाइन स्ट्रीमिंग –

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्क पाहायला मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment