IND vs ENG : हिरव्या खेळपट्टीबाबत जेम्स अँडरसन म्हणाला,”मला वाटत नाही की भारत तक्रार करेल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नॉटिंगहॅम वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की,”ज्याप्रकारे या वर्षाच्या सुरुवातीला भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या होत्या, त्याच प्रकारे इंग्लंडलाही पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत जलद आणि वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (4 ऑगस्ट) येथे सुरू होईल. अँडरसन म्हणाला, “जर आम्ही खेळपट्टीवर काही गवत सोडले तर मला वाटत नाही की, भारत तक्रार करू शकेल, कारण गेल्या भारत दौऱ्यात आम्ही त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीत नक्कीच खेळलो.”

“त्यांनी घरच्या परिस्थितीचा आपल्या फायद्यासाठी वापर केला आणि माझा विश्वास आहे की, जगभरातील अनेक संघ असे करतात,” असे त्याने सोमवारी भारतीय पत्रकारांना सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये 617 विकेट घेणारा अँडरसन म्हणाला, “जर खेळपट्टीवर थोडे गवत असेल तर भारताकडेही वेगवान गोलंदाजीचे चांगले आक्रमण आहे.” तो म्हणाला कि, “मला काही चांगल्या खेळपट्ट्यांची अपेक्षा आहे. आम्हाला खेळपट्ट्यांमध्ये वेग हवा आहे. वेगवान गोलंदाज म्हणून आम्हाला वेग आणि उसळी हवी आहे, कारण आम्हाला माहित आहे की, जेव्हा चेंडू स्विंग होईल तेव्हा चेंडू बॅटची कट घेण्याची शक्यता वाढते.”

वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “नुकत्याच समोर आलेल्या खेळपट्टीचे चित्र पहिल्या कसोटी सामन्याच्या तीन दिवस आधीचे आहे. दरम्यान, बरेच काही बदलू शकते. मला खात्री आहे की, ते काही गवत कापतील आणि त्यावर रोलरही फिरवतील. ” आतापर्यंत 162 कसोटी सामने खेळणाऱ्या अँडरसनने IPL पिढीतील फलंदाजांनी निष्काळजीपणे फलंदाजी केल्याचे मान्य केले आणि या संदर्भात ऋषभ पंतचे उदाहरण दिले.

तो म्हणाला, “वेगवेगळ्या पिढ्यांच्या फलंदाजांविरुद्ध खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. IPL पिढीतील फलंदाजांमधील फरक तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. ते बेजबाबदारपणे खेळतात आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये शॉट माकरण्यास घाबरत नाही. ”अँडरसन म्हणाला,“ ऋषभ पंतकडे बघा, तो गेल्या दौऱ्यात नवीन चेंडूवर माझ्याविरुद्ध रिव्हर्स स्वीप करत होता. तुम्ही सौरव गांगुलीला असे करताना कधीच पाहिले नसते. ”

या अनुभवी गोलंदाजाने मालिकेपूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला लक्ष्य करण्याविषयी बोलले नाही. तो म्हणाला, “भारताची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि तुम्ही कोणत्याही एका फलंदाजावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. विराट कोहली नक्कीच एक महत्वाची विकेट असेल कारण तो कर्णधार आहे आणि त्याचा संघावर सकारात्मक प्रभाव आहे. चेतेश्वर पुजारा असा फलंदाज आहे जो क्रीजवर जास्त काळ पाय रोवून उभा राहू शकतो. आणि हो, ती सुद्धा एक महत्त्वाची विकेट आहे. “

Leave a Comment