IND vs ENG: इंग्लंडच्या कर्णधाराने भारताविरूद्ध रचला इतिहास!

0
111
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना कर्णधार जो रूट याने इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला आहे. या पाचही गोलंदाजांचा नेटाने सामना करत जो रूटने आपली खेळी केली आहे. भारतात झालेल्या कसोटी मालिकेत जो रूटने भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. तशीच सुरुवात त्याने आजच्या सामन्यात केली होती.

रूट ठरला इंग्लंडचं ‘रनमशिन’
जो रूटने आजच्या खेळीदरम्यान इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या अलिस्टर कूकला मागे टाकले आहे. जो रूटच्या १५ हजार ७३९ धावा झाल्या आहेत. कूकने आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५७ सामने खेळले आणि त्यात त्याने एकूण १५ हजार ७३७ धावा केल्या आहेत. रूटने मात्र आपल्या २९०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कूकला मागे टाकत इतिहास रचला आहे. तो इंग्लंडच्या क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

जो रूटने १५ हजार ३९३ धावांचा टप्पा पार करत सर्वकालीन फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये २९ वा क्रमांक तर सध्या सक्रिय असलेल्या क्रिकेटर्समध्ये आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत विराट कोहली २२ हजार ८७५ धावांसह अव्वल तर न्यूझीलंडचा रॉस टेलर १८ हजार ५४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here