Saturday, March 25, 2023

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

- Advertisement -

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी अजूनपर्यंत कोणत्याही ओपनरची निवड करण्यात आलेली नाही.

टीम इंडियाकडे ओपनर म्हणून आता फक्त मयंक अग्रवालचाच पर्याय उपलब्ध आहे. तसेच स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन आहे. केएल राहुलसुद्धा टेस्ट ओपनर आहे, पण टीम मॅनजमेंटने त्याला ओपनिंगची जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो आता मधल्या फळीत खेळणार आहे.

- Advertisement -

टीम इंडियाच्या मॅनजमेंटने शुभमन गिलऐवजी कोणत्याच खास खेळाडूची मागणी केली नव्हती.म्हणजेच टीमने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची कधीही मागणी केली नसल्याचे समोर आले आहे. गिलला पर्याय शोधण्याची जबाबदारी निवड समितीवरच सोडण्यात आली आहे.