मँचेस्टर | विश्वचषकातील सेमी फायनलच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला पावसाचे ग्रहण लागले आहे. तर आज मँचेस्टर मध्ये आभाळ निरभ्र असल्याने तेथे होणार उर्वरित सामना आज पार पडण्याची शकता आहे. काल पाऊस येईपर्यंत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ विकेटच्या बळावर २११ धावा काढल्या आहेत. तर त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवावा लागला आहे.
भारतीय वेळेनुसार ठीक तीन वाजता सामना सुरु होणार आहे. या सामन्याच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय वेळेनुसार ४.३० वाजता जोरदार पाऊस पडू शकतो तसेच ९.३० वाजता देखील पाऊस पडू शकतो असे तेथील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. अशा सर्व पावसाच्या ढगांच्या रोमांचक हालचाली मध्ये भारताचा खेळ रोखून धरला गेला आहे.
पाऊसजन्य परिस्थिती ओढवल्यास साखळी सामान्यात दोन्ही संघाने केलेली कामगिरी लक्षात घेऊन अंतिम सामन्यात कुणी जायचे याचा निर्णय जाहीर केला जातो. त्यामुळे भारत सध्या गुणसंख्येत प्रथम स्थानी आहे. तर साखळी सामन्यातील भारताची कामगिरी न्यूझीलंडपेक्षा उजवी आहे. त्यामुळे भारतच फायनलमध्ये जाणार हे निश्चित आहे. विशेष बाब म्हणजे साखळी सामन्यात हि भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पावसाने रद्द केला होता.