IND vs SA: स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायले ‘मां तुझे सलाम’ गाणे

IPL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज (IND vs SA) खेळत आहे. या सिरीजमध्ये (IND vs SA) दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यात (IND vs SA) टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात अपयशी ठरली आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी दुसऱ्या टी 20 सामन्यातील छाती अभिमानाने फुलून येईल, असा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना सुरु असताना हजारो प्रेक्षक ‘मा तुझे सलाम’ हे गाणं गुणगुणत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे
भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सामना सुरु होण्याच्या अगोदरचे हे दृश्य आहे. जेव्हा सगळं मैदान भरलं होतं. हजारो प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते, व त्यांनी आपली मोबाइलची फ्लॅश लाइट ऑन केली होती. असंच दृश्य 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरसुद्धा पाहायला मिळाले होते.

दक्षिण आफ्रिकेची मालिकेत आघाडी
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (IND vs SA) 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजानी आणि गोलंदाजानी संपूर्ण निराशा केली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. यानंतर भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून भारताला चांगली सुरुवात करुन दिली मात्र बाकी गोलंदाजाना अपयश आले. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला.

हे पण वाचा :
IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी

खुशखबर !!! Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली; सोमय्यांचा गंभीर आरोप

मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार