मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20 Series) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला (IND vs SA T20 Series) सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी (IND vs SA T20 Series) दोन्ही टीमना कठोर बायो-बबलचे नियम पाळण्याची गरज नाही, म्हणजेच खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना आता क्वारंटाईन व्हावं लागणार नाही. कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर मागच्या 2 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सीरिज बायो-बबलच्या नियमांशिवाय पार पडणार आहे.
कोणते असणार निर्बंध
टीम इंडियाची बायो-बबलमधून सुटका झाली असली तरी त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या सिरीजदरम्यान खेळाडूंना मोठ्या कार्यक्रमांना जायची परवानगी नाही, तसंच त्यांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करावं लागणार आहे.
आयपीएलमध्ये बायो-बबल
नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये 10 टीम बायो-बबलमध्ये होत्या, तसंच खेळाडूंनाही बायो-बबलमध्ये यायच्या आधी 3 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं होतं. या नियमांमुळे खेळाडूंना मोठी अडचण होत होती. म्हणून बीसीसीआयने बायो-बबलचे नियम काढण्याची भूमिका घेतली.
10 दिवसांमध्ये 5 टी-20
9 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 5 टी-20 खेळवल्या जाणार आहेत. या सिरीजची शेवटची मॅच 19 जूनला होणार आहे. म्हणजेच टीमला 10 दिवसांमध्ये 5 सामने खेळावे लागणार आहे.
सीनियर खेळाडूंना देण्यात आली विश्रांती
या सीरिजमध्ये (IND vs SA T20 Series) भारताच्या अनेक सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सीरिजसाठी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंचे टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
हे पण वाचा :
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
मोहाडीत मालवाहतूक गाडी ट्रकची धडक, ट्रॅव्हल्समधीत 3 जण गंभीर जखमी
‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या FD चे व्याजदर !!!
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका