Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड ! दोन दिवसांपूर्वी मार्टिन गुप्टिलने केलेला विक्रम मोडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काल इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला T-20 सामना पार पडला. यामध्ये सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित शर्माने (Rohit Sharma) रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या T-20 सामन्यात नवा विश्वविक्रम केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता. तो आता रोहितच्या (Rohit Sharma) नावावर नोंदवला गेला आहे.

कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा आतापर्यंत T-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मागिल 12 पैकी 11 सामन्यांत पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने मागिल 15 पैकी 14 सामने जिंकले आहेत. 2022 मध्ये भारताने T-20 त इशान किशन (13 डाव), रोहित शर्मा (9), ऋतुराज गायकवाड (6), संजू सॅमसन (2), रिषभ पंत ( 2), दीपक हुडा (1) व सूर्यकुमार (1) अशा सलामीवीरांचा प्रयोग केला.

या सामन्यात भारताने 7 षटकांत 50 धावांचा टप्पा ओलांडला. 33 वी धाव घेताच रोहित (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T-20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 3399 धावा करणाऱ्या मार्टिन गुप्तीलला मागे टाकले. रोहितच्या (Rohit Sharma) नावावर आता 3406 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 3308 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?