IND vs WI 2nd ODI : टीम इंडियाने इतिहास रचला ! अजून कोणालाच जमला नाही ‘हा’ पराक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अक्षर पटेलच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI 2nd ODI)  2 गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रेयस अय्यर, संजू सॅमसनच्या अर्धशतकानंतर अक्षराच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत (IND vs WI 2nd ODI) 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

एकाच संघाबरोबर सलग 12 मालिका विजय
भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा सलग 12व्या मालिकेत पराभव (IND vs WI 2nd ODI) केला आहे. 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अक्षरशिवाय श्रेयस अय्यरने 63 आणि संजू सॅमसनने 54 धावा केल्या. याअगोदर 100 वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने कायले मेयर्ससह 65 धावांची भागीदारी केली. त्यानंतर होपने शामार्ह ब्रुक्ससह 62 धावांची आणि कर्णधार निकोलस पूरनसह 117 धावा जोडल्या. पूरन 77 चेंडूंत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 74 धावांवर त्रिफळाचीत झाला. होपने त्यानंतर षटकार खेचून शतक पूर्ण केल.100 व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला आहे. सलामीवीर शे होपने 135 चेंडूत 115 धावांची खेळी केली.

कालच्या सामन्यात (IND vs WI 2nd ODI)  विजय मिळवून टीम इंडियाने एका टीमविरुद्ध सर्वाधिक वनडे सीरिज जिंकण्याचं रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. जानेवारी 2007 पासून भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची एकही वनडे (IND vs WI 2nd ODI) सीरिज हरलेली नाही. या अगोदर हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने लागोपाठ 11 वनडे सीरिज जिंकण्याचा विक्रम कमजोर झिम्बाब्वेविरुद्ध केला आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 वनडे सीरिज झाल्या, यातल्या एकाही सीरिजमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला नाही.

एका टीमविरुद्ध लागोपाठ वनडे सीरिज विजय
11 वेळा भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले. (2007 पासून आतापर्यंत)
11 वेळा पाकिस्ताननने झिम्बाब्वेला पराभूत केले. (1996 पासून आतापर्यंत)
10 वेळा पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केले. (1996 पासून आतापर्यंत)
9 वेळा दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला पराभूत केले (1995 पासून आतापर्यंत)
9 वेळा भारताने श्रीलंकेला पराभूत केले. (2007 पासून आतापर्यंत)

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?