IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाली संधी तर कुणाला विश्रांती ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) 3 एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे. भारतानं झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (IND vs ZIM) 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा एकदा शिखर धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेतून सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

शिखर धवनकडे कर्णधारपद
या सीरिजसाठी (IND vs ZIM) शिखर धवनकडे पुन्हा एकदा कर्णधारपद देण्यात आले आहे. धवननं अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि टीम इंडियाने कॅरेबियन भूमीवर प्रथमच वनडेमध्ये 3-0 असा क्लीन स्वीप केला होता.

कोणाला मिळाली संधी ?
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (IND vs ZIM) वेगवान गोलंदाज दीपक चहरचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएल 2022 मध्ये तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. त्यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे.

कुणाला देण्यात आली विश्रांती ?
या मालिकेतून (IND vs ZIM) सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (IND vs ZIM) भारताचा एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?