Friday, June 9, 2023

भारत- पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला; T-20 विश्वचषक स्पर्धेत येणार आमनेसामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2021 T-20 विश्वाचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेलं भारत आणि पाकिस्तान मध्ये जोरदार महामुकाबला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

नुकतीच आयसीसीने याबाबत घोषणा करताना हे जाहीर केले की 2021 T -20 विश्वचषक स्पर्धेत एकाच ग्रुप मध्ये असतील. दोन्ही संघाचा ग्रुप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. सुपर 12 च्या एका गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला ठेवण्यात आले आहे.

दरम्यान भारत आणि पाकिस्तान मधील क्रिकेट सामने हे नेहमीच हाय वोल्टेज असतात. क्रिकेट प्रेमींसाठी हा सामना म्हणजे आनंदाचा क्षण असून गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.