हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूर. हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) बालेकिल्ला… राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या… पण अजित दादांनी दत्तात्रय भरणे हे आपल्या भिडूला बळ दिलं… आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं… पण अजित दादांच्या सोबत भरणे आल्याने इंदापूरचं महायुतीचं तिकीट कुणाला? भरणे की हर्षवर्धन पाटील? असा मोठा गुंता असताना शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळून एका नव्या भिडुला मैदानात आणून इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणलाय… शरद पवारांचा हा भिडू नेमका आहे तरी कोण? आणि हर्षवर्धन पाटील – दत्ता भरणे यांच्या राजकारणावर फुल्या मारत इंदापूरचा आमदार होण्याची ताकद खरच त्याच्यात कितपत आहे? शरद पवारांनी इंदापूरच्या राजकारणात एकाच दगडात तीन पक्षी कसे मारलेत? तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये…
जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनई उद्योगाच्या संचालक प्रवीण माने हे लवकरच अजित पवार गटातील शरद पवारांच्या गोटात येत राष्ट्रवादीची तुतारी हाती धरणार आहेत… खरंतर इंदापूरच्या राजकारणात स्पर्धा ही नेहमी हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे यांच्यातच पाहायला मिळाली… या तिघांना पुरून उरेल, असा तिसरा चेहरा मतदार संघात उदयास आला नाही, किंवा तशी राजकीय परिस्थितीही इंदापुरात कधी आली नाही… पण राष्ट्रवादीत फूट पडली… पाटील आणि भरणे हे पारंपारिक विरोधक झालं गेलं सारं विसरून महायुतीच्या एका छताखाली आले… नाईलाजाने का होईना पण त्यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचा खांद्याला खांदा लावून प्रचार केला…
पण या सगळ्यात एक नाव चर्चेत आलं होतं… ते म्हणजे प्रवीण माने यांचं… जिल्हा परिषद, उद्योग संस्था यांचं जाळू उभारून माने हे तालुक्याच्या राजकारणात जम बसवू लागले… म्हणूनच जेव्हा खासदारकीला मानेंनी सुप्रिया ताईंचे काम करायला सुरुवात केली… तेव्हा दस्तूर खुद्द फडणवीसांनी प्रवीण मानेंच्या घरी भेट देत चर्चा केली होती… तेव्हा लोकसभेला ते पुन्हा महायुतीच्या म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने प्रचार करताना दिसले… एवढेच काय तर हर्षवर्धन पाटील – दत्तामामा भरणे – प्रवीण माने हे एकमेकांच्या विरोधात असणार त्रिकूट एकाच गाडीत अजित दादांसोबत सेल्फी मध्ये दिसले… पण सारी शक्ती पणाला लावूनही इंदापुरातून सुनेत्रा पवार या मायनसमध्ये गेल्या… अर्थात येणाऱ्या विधानसभेला विद्यमान आमदार दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पुन्हा एकदा आमदार होण्याच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला… या दोघांपैकी एक जण निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांची तू तरी हाती धरेल, असाही एक अंदाज लावला जात असताना… शरद पवारांनी तिसराच मोठा गेम करत प्रवीण माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय…
यामुळे काट्याने काटा काढावा अशी चाललेली पाटील विरुद्ध भरणे अशा लढतीत आता माने हा नवा खिलाडी आमदारकीसाठी टफ फाईट देताना दिसेल.. सोनाई संस्थेच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यात चांगला कनेक्ट आहे.. दुष्काळी चारा छावणी, सामुदायिक लग्न सोहळे, आरोग्य शिबिरेअशा अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी आपला जनसंपर्क चांगलाच दमदार केलाय… त्यामुळे मानेंच्या या जनसंपर्क आणि संस्थात्मक राजकारणाला शरद पवारांची साथ मिळाली तर कदाचित इंदापूरचा निकाल अनपेक्षित वळणावर जातानाही पाहायला मिळू शकतो…
धनगर समाज आजही एक गठ्ठा भरणे मामांसाठी निर्णायक मतदान करतो. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच. पण मागील काही दिवसांपासून तालुक्यातील त्यांचा कनेक्ट कमी झालाय, आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं ध्रुवीकरण झाल्यानं हा समाज यंदा भरणे मामांच्या विरोधात जाऊ शकतो. त्यात विरोधकांनी मलिदा गॅंग आणि टक्केवारीचा मुद्दा उचलून धरल्याने आणि संस्थात्मक राजकारणात भरणे मामा फार मागे असल्याने यंदा हर्षवर्धन पाटलांसाठी घोडे मैदान तुलनेने सोपं झालं होतं… कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा हट्ट धरलाय, अस स्टेटमेंट करून त्यांनी कुठल्या पक्षाकडून नाही तर आपली वैयक्तिक ताकद येणाऱ्या विधानसभेला आजमावण्याची भाषा आधीच बोलून दाखवलीये… पण हर्षवर्धन पाटलांच्या हातात तोंडाशी आलेला आमदारकीचा घास आता शरद पवारांच्या मदतीने प्रवीण माने हिसकावून घेतात का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे हे देखील शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ठाण मांडून बसल्याचं समजतंय… बहुदा मानेंच्या शरद पवार गटातील एन्ट्रीच्या चर्चेआधी त्यांचंच नाव जवळपास शरद पवार गटाकडून फिक्स समजले जात होतं… पण आता प्रवीण माने स्वतः शरद पवार गटात आल्याने… मतदारसंघात तुतारीचा आवाज जोरदार काढण्यासाठी लागणारी संघटनात्मक यंत्रणा आणि राजकीय जनसंपर्क यामध्ये माने हे कधीही उजवे ठरतात… त्यामुळे इंदापूर मध्ये यंदा दुरंगी नाही तर तिरंगी खत्रुड सामना पाहायला मिळणार आहे… सध्या तरी महायुतीकडून राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे – अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील – तर शरद पवार गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे निवडणूक रिंगणात दिसतील…त्यामुळे एकूणच इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोचलेल्या इंदापूरच्या राजकारणाचा आमदारकीचा गुलाल यंदा कोणाच्या कपाळाला लागतोय? हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे? इंदापूर चा 2024 चा आमदार कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…