इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीला झालेत नकोसे ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीला काँग्रेससाठी सोडावी लागणार आहे. त्या जागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणार असल्याचे सध्या चित्र आहे. तर इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नशिबी मात्र वनवासचं येणार का अशा देखील चर्चा आहेत.

गत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्या त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पराभूत व्हावे लागले. आता दोन्ही काँग्रेसने एकत्रित लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस आघाडी उभा राहणार आहे. तर दत्तात्रय भरणे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आज बारामती येथे एका कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत त्यांच्याबद्दल सूचक विधान केले आहे. “इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांचे मी बारामती मतदारसंघात सहर्ष स्वागत करतो. असेच प्रेम जिव्हाळा आपुलकी कायम राहू द्या” असे सूचक विधान अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल काढले आहे.

दरम्यान दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्यास हर्षवर्धन पाटील हे भाजप मध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात त्यांनी या आधी साफ इन्कार केला आहे. तर सुप्रिया सुळे यांचे निष्ठेने काम केल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरचे जागा सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल असणार आहे असे बोलले जाते आहे. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे.

Leave a Comment