Independence Day 2024 | आज संपूर्ण भारत देश हा आपल्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमध्ये मग्न झालेला आहे. संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. 15 ऑगस्ट हा दिवस हा एक राष्ट्रीय सण आहे. मोठ्या उत्साहात या सणाचे सेलिब्रेशन केले जाते. 78 वर्षांपूर्वी आपल्या देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी अहोती दिलेली आहे. आणि त्याच लोकांना आणि आपल्या तिरंग्याला आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अगदी शांततेत आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो. परंतु आपल्या देशात असे एक राज्य आहे, ज्या देशात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा केला जात.
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या गोवा या राज्यांमध्ये 15 ऑगस्ट साजरा केला जात नाही. संपूर्ण देशात जरी या दिवशी उत्साहाचे वातावरण दिसत असले, तरी गोव्यात मात्र अत्यंत शांततेत हा दिवस जातो. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. याच गोव्यावर पोर्तुगीजांनी तब्बल 400 वर्षे राज्य केलेले आहे. त्या भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. परंतु त्यानंतर 14 वर्षांनी म्हणजेच 1961 साली गोवा हा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि त्यामुळेच 15 ऑगस्ट रोजी गोव्यात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही.
1510 रोजी पोर्तुगीजांनी गोव्यावर हल्ला केला आणि संपूर्ण गोवा त्यांच्या ताब्यात घेतलं. या लोकांनी अनेक वर्षे इथे राज्य केलं. भारताच्या स्वतंत्र नंतरही गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. परंतु अनेक प्रयत्न यशस्वी झाले आणि पोर्तुगीजांनी प्रत्येक वेळी भारत सोडण्यास नकार दिला. कारण त्यांना भारतात त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता.
गोवा हे राज्य मसाल्याच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेलची, काळी मिरी, केसरच्या बागा आहेत. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून हे राज्य अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे पोर्तुगीजांना या राज्यातून प्रचंड नफा कमवता आला. त्यांनी दीर्घकाळ गोव्यामध्ये त्यांचे वास्तव्य ठेवले. गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी भारताने हवाई हल्ल्यासोबत लढाईसाठी देखील लष्कर तयार केले होते. आणि त्यानंतरच गोव्याला मुक्त करण्यामध्ये यश आले होते. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हे पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाले. त्यामुळे गोवा त्यांचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट ऐवजी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दीन म्हणून साजरा करतात.